संगणकीकृत दस्त नोंदणी पद्धतीमध्ये दस्तविषयक माहिती जसे की, मिळकत, दस्तातील पक्षकार, मुद्रांक शुल्क, नोंदणी फी, ओळखदार इत्यादी विषयांची माहिती संगणकात भरावी लागते. ही माहिती पक्षकाराला स्वतःला कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणाहून भरता यावी, यासाठी विभागाच्या संकेतस्थळावर जी सुविधा उपलब्ध आहे, त्याला पब्लिक डाटा एन्ट्री (PDE) म्हणून संबोधले जाते
जनतेला फायदे-
1) पब्लिक डाटा एन्ट्री द्वारे पक्षकार स्वतःच्या दस्ताची माहिती केव्हाही व कोठूनही भरु शकतात.
2) ही माहिती पक्षकार स्वतः भरत असल्याने अधिक अचूक असते.
3) दस्त नोंदणीसाठी पक्षकारांचा दुय्यम निबंधक कार्यालयातील वेळ वाचतो.