डिपॉझिट ऑफ टायटल डीड पदधतीने झालेल्या कर्जव्यवहारामध्ये, उभय पक्षामध्ये करारनामा निष्पादित करण्यात आला नसेल, तर कर्जदाराला त्या कर्जव्यवहाराची माहिती नोटिसव्दारे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयास सादर करावी लागते.
सदर नोटिस फायलिंग करण्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न जावे लागता बँका/वित्तीय संस्था यांच्या शाखेतूनच सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येण्यासाठी ई-फायलिंग (e-Filing) ही सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व बँक /वित्तीय संस्था यांना उपलब्ध करुन दिली आहे. तथापि, ज्या बँका/वित्तीय संस्था सदर प्रणाली मध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांचे कर्जदारांना नोटिस फायलिंगची कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनच पूर्ण करावी लागते.
त्या कर्जदाराने दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्यापूर्वी त्या नोटिस संदर्भातील माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online services या सदराखाली उपलब्ध असलेल्या PDE for filing या सुविधेचा वापर करुन ऑनलाईन भरणे क्रमप्राप्त असते.