दस्त नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ ऑनलाईन आरक्षित (Advance booking ) करुन घेण्यासाठी विभागाने उपलब्ध करुन दिलेली सुविधा म्हणजे ' ई-स्टेप-इन ' होय.
या सुविधेद्वारे सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी साठी वेळ आरक्षित करता येते.
या सुविधेचा वापर करुन खालील कालावधीतील सोयीची वेळ आरक्षित करता येते.
1. सकाळी 10 ते सांयकाळी 6 ही कामाची वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत.
2. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत कामाचा वेळ असलेल्या कार्यालयात सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत.
3. दुपारी 2 ते रात्री 9 पर्यंत कामाची वेळ असलेल्या कार्यालयात दुपारी 2 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत.
* दस्त नोंदणी करीता पक्षकाराने दुय्यम निबंधक कार्यालयात, आरक्षित केलेल्या वेळेच्या अर्धा तास आधी येणे आवश्यक .
या सुविधेचे फायदे
ई-स्टेप-इन या सुविधेचा वापर करुन आपण दस्त नोंदणीसाठीची वेळ आरक्षित करु शकता.
ज्या दुय्यम निबंधक कार्यालयामधे आपणांस दस्त नोंदवावयाचा आहे, त्या कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेपैकी
'ई-स्टेप- इन' सुविधेसाठी वेगळया ठेवलेल्या वेळेपैकी आपल्या सोईची वेळ आरक्षित करता येत असल्याने रांगेमध्ये थांबण्याची आवश्यकता नाही.
वेळेवर नोंदणीसाठी पोहचल्यावर सेवा मिळत असल्याने वेळेची बचत होते.
सामायिक कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयातील आरक्षित झालेल्या वेळा माहिती होतात व त्यानुसार आपल्या सोयीची वेळ निवडता येते
नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली e-Step- in या ठिकाणी उपलब्ध आहे.