एखादया मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदविलेला दस्त नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरुन शोधण्यासाठीची सुविधा म्हणजे ई-सर्च होय.
मिळकतीच्या क्रमांकावरुन किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधण्याची सुविधा विभागाच्या संकेतस्थळावर Online Services या सदराखाली उपलब्ध आहे.
कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचे असते. पूर्वी असे बदल तपासण्यासाठी संबंधित कार्यालयास भेट देऊन शोध घेणे गरजेचे होते. सामायिक कार्यक्षेत्रात (Concurrent Jurisdiction) एका पेक्षा अधिक कार्यालये असतात त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी त्रास होत असे.
या सर्व बाबींचा विचार ई-सर्चच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी सन 2002 नंतर संगणकीकृत पद्धतीने नोंदविलेल्या सर्व दस्तांचा शोध ई-सर्च द्वारे उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ई-सर्च (e-search) द्वारे घरबसल्या 24 तास असा शोध घेता येतो.