आपल्या दस्ताची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता, आपल्या सोयीच्या ठिकाणावरुन व आपल्या सोयीच्या वेळी करण्याची सुविधा म्हणजे ई-रजिस्ट्रेशन होय. इंटरनेटचा वापर करुन आपण सध्या या सुविधेव्दारे विभागाने निश्चित केलेल्या नमुन्यामध्ये आपल्या Leave & License च्या दस्ताची नोंदणी करु शकता. ही सुविधा www.igrmaharashtra.gov.in या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेत स्थळावर Online Services या सदराखाली e-Registration या ठिकाणी उपलब्ध आहे.
ई-रजिस्ट्रेशनचे फायदे
1) इंटरनेटची सुविधा असलेल्या आपल्या सोयीच्या ठिकाणावरुन दस्त तयार करु शकता.
2) कोणत्याही वेळी (24 X 7) दस्त नोंदणीसाठी सादर करता येतो.
3) नोंदणीसाठी दुय्यम निबंधक कार्यालयात यावे लागत नाही.
4) दस्तातील सर्व पक्षकार एका वेळी एकाच ठिकाणी हजर असण्याची गरज नाही
5) रजिस्ट्रेशनवर टिपण
6) ई रजिस्ट्रेशनवर सादरीकरण.
रजिस्ट्रेशनवर टिपण
ई रजिस्ट्रेशनवर सादरीकरण
ई रजिस्ट्रेशन प्रक्रियेवर सादरीकरण
ई रजिस्टर्ड दस्ताची प्रत
ई सर्च रिझल्ट
हेल्पलाईन
ई रजिस्ट्रेशन नियम