सूचना: नोंदणी व मुद्रांक विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या दस्तांच्या मसुदयांचा वापर करणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. मात्र नागरिकांना स्वतःच्या व्यवहारासाठीचे दस्त स्वतः तयार करण्याची इच्छा असल्यास, सुलभ संदर्भ (Ready Reference) म्हणून वापरण्याकरीता विभागामार्फत सदर मसुदे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्याचा आधार घेवून व योग्य तो बदल करुन नागरिक स्वतःचा दस्त स्वतः तयार करु शकतात.