योग्य मुद्रांक शुल्क भरलेला व सर्व पक्षकारांनी सह्या केलेला मूळ दस्त,
ई-पेमेंट द्वारे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरलेली असल्यास त्यासाठीचा पुरावा,
दस्ताच्या कबुलीजबाबासाठी हजर राहणाऱ्या सर्व पक्षकारांची छायाचित्र असलेली ओळखपत्रे,
ओळख पटविणाऱ्या व्यक्ती व त्यांची छायाचित्र असलेली ओळखपत्रे,
दस्त प्रकारानुसार आवश्यक पूरक कागदपत्रे *
नोंदणी करावयाच्या दस्ताच्या प्रति पान रुपये 20/- या दराने रोखीने भरावयाची दस्त हताळणी शल्काची रक्कम,
दस्त कुलमुखत्यारपत्राच्या आधारे कुलमुखत्यार धारकाने निष्पादित केला असेल किवा कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मूळ मालकाच्या वतीने दस्त नोंदणीस सादर करण्यात येत असेल किवा कबुलीजबाब देण्यात येत असेल तर अशा अधिकाराचे मूळ कुलमुखत्यारपत्र, त्याची सत्य प्रत व कुलमुखत्यारपत्र अस्तित्वात (अमलात) असल्याबाबतचे विहित नमुन्यातील घोषणापत्र,
जर पब्लिक डाटा एन्ट्री पर्यायाचा वापर करण्यात आला असेल तर त्याद्वारे प्राप्त 11 अंकी सांकेतांक व नोंदणीपूर्व गोषवाऱ्याची प्रिंट जर पब्लिक डाटा एन्ट्री केली नसेल तर दस्ताची माहिती नमूद केलेला इनपुट फॉर्म व दुय्यम निबंधक कर्यालयात रोखीने भरावयाच्या प्रति पान रुपये 20/- प्रमाणे डाटा एन्ट्री शुल्काची रक्कम.
जर ई-स्टेप इन द्वारे वेळ आरक्षित केली असेल तर त्याची पावती
* कृपया नोंद घ्या की दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेचा भाग म्हणून टीडीएस (स्रोत वजा केलेले कर) प्रमाणपत्राची गरज नाही.